परळी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 31 ऑगस्ट रोजी चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परळी शहर बंदची हाक सर्वपक्षीय सामाजिक संघटनांच्या वतीने देण्यात आली होती. त्यानंतर शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला.
या मूक मोर्चातील लोक रेल्वे स्टेशन परिसरात निषेध करण्यासाठी जमले असता या ठिकाणी एक मद्य धुंद तरुण आढळून आला.
यावेळी परिसरात जमलेल्या महिलांनी या तरुणाला चांगलाच चोप दिला व रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा